देशवासियांना आजच कोरोना लस मिळण्याची शक्यता; केंद्रात मोठी बैठक सुरु

कोरोनाशापित वर्ष संपून नववर्षाच्या स्वागताला तयार असलेल्या देशवासियांसाठी थोड्याच वेळात एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोरोना लसीवर मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारतात आजच कोविशिल्ड लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. सुरुवातीला य़ा लसीला इमरजन्सी परवानगी मिळू शकते.  आज या कोरोना लसीच्या मंजुरीशी संबंधित तज्ज्ञांच्या समितीची (SEC) बैठक होत आहे. या बैठकीत भारतात कोरोना लसीला परवानगी देण्य़ावर निर्णय होणार आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे. ब्रिटनमधील नियामक संस्था मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं (एमएचआरए) ऑक्सफर्ड (Oxford) ऍस्ट्रा झेनेकाच्या (Astra Zeneca) लसीच्या वापरास परवानगी दिली आहे. भारतात ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू आहे. 

सीरमवर जबाबदारी  सीरम इन्सिट्यूट ऑक्सफर्डची लस बनवत आहे.

या कंपीनुसार कोविशिल्डचे 4 ते 5 कोटी डोस बनविण्यात आले आहेत. तसेच 2021 च्या शेवटी 30 कोटी डोस बनविण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस टोचली जाणार आहे. यामध्ये कोरोना वॉरिअर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, 50 हून अधिक वय असलेले लोक आणि आजारी लोकांना देण्याचा विचार आहे. कोरोना लसीसाठी ‘या’ अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार कोरोना व्हायरसची लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. केंद्राची तातडीने, आपत्कालीन परवानगी मिळविण्यासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केले आहेत. ब्रिटन, अमेरिका, बहारीन, रशियामध्ये लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामुळे भारतातही लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

आता ही लस कशी दिली जाणार, कोण कोण लाभार्थी ठरणार, टप्पे, वितरण आदी प्लॅनिंग सुरु असताना अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. अशावेळी सरकारने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केले आहे, जे लसीकरणावर नजर ठेवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.