नागपुरात सीताबर्डी मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी चिक्कार गर्दी

Share This News

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येते की काय याची चिंता आरोग्य विभाग आणि प्रशासनाला लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम कडक करत अनेक निर्बंध लावले आहेत. मात्र, नागरिकांना याचं काहीच गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे.

रविवारी नागपूरच्या सीताबर्डी मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी चिक्कार गर्दी केली होती. या गर्दीत अनेकांनी मास्क घातलं नव्हतं. सोशल डिस्टन्सिंगचा तर पत्ताच नव्हता. त्यामुळे एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरीक मात्र बिनधास्त असल्याचं दिसून येत आहे.

प्रशासन आपल्या पद्धतीने रोज नागरिकांना आवाहन करुन नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. मात्र, नागरिकांना याचं गांभीर्य वाटत नसल्याचं या गर्दीवरुन दिसून येतं. बाजारात हजारोंच्या संख्येनं लोकांची गर्दी असताना मात्र मनपा प्रशासनाची बघ्याची भूमिका घेतली.

अमरावतीच्या बाजारात, मॉलमध्ये सकाळपासून गर्दी

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहर आणि अचलपूर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी आठवडाभराचा लॉकडाऊन लावला आहे. आज रात्री आठ वाजता पासून लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. पुढील आठवड्यात आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या बाजारपेठ बंद राहणार असल्याने अमरावतीचे नागरिक आज सकाळपासूनच खरेदी करण्यासाठी बाजारपेठमध्ये गर्दी करत आहेत.

एरवी दहा वाजता उघडणारा डी-मार्ट आज सकाळी सात वाजता उघडण्यात आला आणि सकाळी सात वाजता पासूनच अमरावती करांनी खरेदीसाठी डी-मार्टमध्ये रांग लागली. तर, शहरातील सगळ्यात मोठी बाजारपेठ इतवारामध्ये देखील अमरावतीकर यांची खरेदीसाठी गर्दी झाली.

नाशिकच्या फुल बाजारात गर्दी

नाशिकच्या फुल बाजारात नाशिककरांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नाशिककरांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. नागरिकांना सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा विसर पडल्याचं चित्र नाशकात आहे. शहरात कोरोना चा वाढता आकडा लक्षात घेता आजपासून विना मास्क आढळल्यास 1000 रुपये दंड

जळगावात दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटीव्ह रुग्ण, तरीही नागरीक बेफिकीर

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरु आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटीव्ह रुग्ण समोर येत आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे.

जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे आणि भाजीपाला मार्केट आहे. याठिकाणी दररोज पहाटे 5 वाजेपासून मालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून याठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत लिलाव सुरु असतो.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. सर्वात धोक्याची बाब म्हणजे, याठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय येथून फळे आणि भाजीपाला घराघरात जातो. अशाने कोरोनाचा फैलाव रोखणे कठीण होऊ शकते


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.