कच्च्या तेलाच्या निर्मितीमध्ये सौदी अरेबियाकडून कपात; देशात पेट्रोल, डिझेलचे दर कडाडले

मुंबई :सध्या कच्च्या तेलाचा दर मागील 10 महिन्यातील उच्चांकी पातळीवर आहे. परिणामी भारतामध्येसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (petrol and diesel prices) मोठी वाढ झाली आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलीटरमागे 23 पैशांनी वाढला असून 84.20 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलमध्येसुद्धा प्रतिलिटरमागे 26 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये डिझेलचे दर 74.38 रुपयांवर पोहोचले आहेत. (petrol and diesel prices rise in india and maharashtra all details)

दिल्लीमध्ये बुधवारीसुद्धा (6 जानेवारी) पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे 26 पैशांनी वाढ झाली होती. तर डिझेलचे दर 25 पैशांनी कडाडले होते. दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे प्रतिलीटरमागे 83.97 आणि 74.12 रुपये होता. त्यानंतर आज ( गुरुवार 7 जानेवार) सुद्धा पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

इंडियन ऑईल (India Oil) च्या वेबसाईटनुसार देशातील प्रमुख शहरांपैकी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 84.20 रुपये आहे. तर कोलकाता येथे पेट्रोल प्रतिलीटर 85.68 रुपयांवर आला आहे. मुंबई आणि चेन्नई या शहरात पेट्रोल 90.83 आणि 86.96 रुपये प्रतिलीटर रुपयांनी विकले जात आहे. तर दिल्लीमध्ये डिझेलचा दर प्रतिलीटर 74.38 रुपये आहे. तर मुंबईमध्ये डिझेल प्रतिलीटर 81.07 प्रतिलीटर या दराने विकले जात आहे.

राज्याची स्थिती काय?

जागतिक पातळीवर तेलाचे भाव भडकल्याने त्याची झळ स्थानिक पातळीवर जाणवू लागली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये पैट्रोलचा दर वधारला आहे. ताज्या माहितीनुसार मुंबईमध्ये पेट्रोलचा आजचा दर प्रतिलीटर 84.20 रुपयांवर आला आहे. तर डिझेलचा दर प्रतिलीटर 81.07 रुपयांवर पोहोचला आहे. नागपुरात हा दर पेट्रोल प्रतिलीटर 91.11 रुपये तर डिझेल प्रितलीटर 80.11 रुपयांवर पोहोचला आहे. औरंगाबादमध्येसुद्धा पैट्रोलचा दर वाढला असून पैट्रोल 91.83 प्रतिलीटरप्रमाणे विकले जात आहे. येथे डिझेल 82.2 रुपये प्रतिलीटरवर पोहोचले आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 90.51 आणि 79.54 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत रोज सकाळी बदल होतो. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. एक्साईज ड्यूटी, डीलर कमीशन आणि अन्य कर मिळून इंधनाचे दर वाढतात किंवा कमी होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.