वंजारी नगर उड्डाणपुलावर तरुणांचे धोकादायक स्टंट

नागपूरच्या वंजारी नगर उड्डाणपुलावर काही तरुण धोकादायक स्टंट करीत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.  वंजारी नगर उड्डाण पुलाचे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतच उदघाटन झालं आहे.  त्याच उड्डाण पुलावर प्रजासत्ताक दिनी काही तरुणांनी धोकादायक स्टंट केल्याचं समोर आलं आहे. प्रजासत्तक दिनी काही तरुण तीव्र वेगात कार चालवून अचानक ब्रेक मारून धोकादायक स्टंट करीत असल्याचं या व्हिडिओत दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात आले होते. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराराष्ट्रीय उद्यानाच्या उदघाटना साठी मुख्यमंत्री नागपुरात होते. अशात एकीकडे सुरक्षेसाठी नागपूर शहरात सुमारे अडीच  तैनात असताना दुरीकर मात्र काही तरुण अशाप्रकारे उड्डाणपुलावर धुडघूस घालत होते. आता हा व्हिडीओ समोर आल्यावर नागपूर पोलीस या धुडघूस घालणाऱ्या या तरुणांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.