कोरोनासाठी टोसिलिझुमॅबला डीसीजीआयची मंजुरी

नवी दिल्ली
देशात कोरोनाची धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापयर्ंत कोरोना प्रतिबंधक सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू असताना कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आता औषध उत्पादक कंपनी हेटेरोच्या कोरोनावरील औषधाला भारतीय औषध महानियंत्रकांनी ( डीसीजीआय) मंजुरी दिली आहे.
कोरोनावरील उपचारासाठी प्रौढांवर आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. हेटेरोने याबाबतची माहिती दिली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या प्रौढांवर उपचारासाठी डॉक्टर टोसिलिझुमॅबचा (टोसिरा) वापर करू शकतात, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हैदराबाद येथील हेटेरोच्या प्लांटमध्ये टोसिराची निर्मिती केली जाणार आहे. हेटेरो कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर आणि फॅविपीरावीरची निर्मिती देखील करते. भारतात हेटेरोच्या टॉसिलिझुमॅब (टोसिरा) ला मंजुरी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. यामुळे कोरोनावर उपचार करण्यासाठी मदत होणार आहे, असे हेटेरो ग्रुपचे अध्यक्ष डॉ. बी पार्थ सारधी रेड्डी यांनी सांगितले आहे.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.