वाघिणीसह दोन बछडयांचा मृत्यू

एका वाघिणीचा तिच्या दोन बछडयांसह मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या कऱ्हाडला अभयारण्यात उघडकीस आली. उमरेड पवणी कऱ्हाडला वन परीक्षेत्राच्या  कऱ्हाडला रेंज मध्ये शुक्रवारी एक वाघीण व तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. वाघीण व बछडयांच्या मृतदेहनजीक एका जनावराचे अर्धवट खाललेला मृतदेह देखील वन कर्मचाऱ्यांना आढळून आला आहे. जयमुले विषप्रयोग करून या वाघांना ठार मारल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाघांचे मृतदेह जय ठिकाणी सापडले आहेत तो शेती परिसरा नजीक आहे. या घटनेचा तपास वन विभागातर्फे करण्यात येत असून पेंच व्याघ्र प्रकल्पातुन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले. शेजारीच एक गाईचे वासरू मृतावस्थेत आढळले आहे. विषबाधेने या वाघांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणात विषप्रयाेग करण्याच्या आराेपात शेजारील शेतमालकाला अटक करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाचवेळी वाघिण व बछडे मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहे.

कऱ्हांडला बिट परिसरात ठाणा तलावाजवळ कम्पार्टमेंट क्रमांक १४१५ येथील नवेगाव साधू शिवारात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान ही धक्कादायक बाब उजेडात आल्याने माेठीच खळबळ उडाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळी एका गाईच्या वासराची शिकार वाघिणीने केली असून त्यानंतरचा हा प्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती आहे. याप्रकरणाच्या संपूर्ण बाबींचा शोध घेतला जात असून तीन ते चार दिवसापूवीर्ची ही घटना असावी असा कयास सुद्धा लावला जात आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत वन्यजीव आणि वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीला तीन बछडे होते. यापैकी दोन छावे मृतावस्थेत आढळून आले. वाघिणीचा तिसराही छावा मृत पावल्याची भीती व्यक्त केली जात असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आर. बी. गवई यांनी स्पष्ट केले. दरम्यान मृत जनावरावर विषप्रयाेग करूनच वाघांना मारण्यात आल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणात अभयारण्याच्या शेजारीच शेत असलेल्या शेतमालक दिवाकर नागाेकर नामक शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चाैकशी केली जात असल्याचे वनविभागाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.