कुस्तीत पराभव झाल्याने तिने केली आत्महत्या फोगाट कुटुंबाला धक्का Defeat in wrestling shocked the Fogat family

Share This News

नवी दिल्लीः जागतिक स्तरावर कुस्तीमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या गिता आणि बबिता फोगाट यांच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. कुस्तीत झालेला पराभव जिव्हारी लागून त्यांची मामे बहीण रितिका फोगाट हिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
रितिकाने गिता आणि बबितापासून प्रेरणा घेत कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. राजस्थानमधील भरतपूर येथे काही दिवसांपूर्वी राज्यस्तरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजन गटात सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात विजयाने तिला केवळ एका गुणाने हुलकावणी दिली. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने गळफास लावून आत्महत्या केली. मागील काही वर्षांपासून रितिका ही महावीर फोगाट या तिच्या काकाकडे यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत होती. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी या घटनेवर दुखः व्यक्त केले आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.