डीडीयू रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, चालक आंदोलकाचा मृत्यू (Delhi Farmer tractor march DDU marg tractor accident driver died

Share This News

दिल्ली सीमेवरील आयटीओ येथे हे आंदोलन हिंसक झालं. या ठिकाणच्या काही आंदोलकांनी मोर्चाचा मार्ग बदलत थेट लाल किल्ल्यावर चढाई केली. दरम्यान डीडीयू रस्त्यावर सुरु असलेल्या ट्रॅक्टर मार्चमधील एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर चालवणाऱ्या चालक आंदोलकाचा मृत्यू झालाय (Delhi Farmer tractor march DDU marg tractor accident driver died).

डीडीयू रोडवर पोलिसांकडून ठिकठिकाणी रस्ते अडवण्यात आलेत. त्यातच ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. या ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांविरोधात घोषणा देत गोंधळही घातला. शेतकरी आंदोलकांनी आक्रमक रुप धारण केल्याने दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलंय.

दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मोजक्या ठिकाणी विशिष्ठ मार्गानेच ट्रॅक्टर मार्च काढण्यास परवानगी दिली होती. मात्र, काही ठिकाणी हे पाळलं न गेल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापटही झालीय.

दिल्लीतील आयटीओ येथील पूरे चौकात शेकडो शेतकरी आंदोलक उभे आहेत. डीटीसीच्या एका बसचंही येथे नुकसान झालंय. या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांना लाल किल्ल्यावर जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. दरम्यान, पोलीस आणि आंदोलकांच्या या झटापटीत आंदोलकांसोबतच पोलीस कर्मचारीही जखमी झालेत.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलंय. तसेच शांतता हीच शेतकरी आंदोलनाची ताकद असल्याची आठवण करुन दिलीय. हिंसक आंदोलन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नुकसान करेल, असंही योगेंद्र यादव यांनी नमूद केलंय.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.