रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच महिलेची प्रसुती; बालकाचा मृत्यू

भरती न करून घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप

नागपूर : नागपूरच्या डागा स्मृती शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वॉर्डात महिलेची जमिनीवर प्रसुती झाली. डॉक्टर आणि परिचारिकांना विनंती करुनही भरती न केल्याने, रुग्णालयाच्या प्रतीक्षालयातच महिलेची प्रसुती झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.  महिलेने मृत बाळाला जन्म दिला. मात्र विनंती करूनही भरती न केल्यानं रुग्णालयाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.
नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात एक मलहिला प्रसुतीसाठी आली होती. या महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या प्रतीक्षालयात अर्थात वेटिंगरुममध्येच झाली. महिलेने मृत बाळाला जन्म दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आरोप धक्कादायक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या महिलेला अॅडमिट करण्यासाठी क्टर आणि परिचारिकांना विनंती केली. मात्र त्यांनी रुग्णालयात दाखलच करुन घेतले नाही.
महिलेला प्रसवकळा इतक्या होत्या की, तिची प्रसुती प्रतीक्षालयातच झाली. यावेळी बाळही मृतच जन्माला आल्यामुळे नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी रुग्णालयाला धारेवर धरले. महिलेला दाखल करुन न घेतल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. इतकेच नाही तर नातेवाईकांनी पोलिसातही तक्रार दाखल केली. रुग्णायलयातील हा संपूर्ण प्रकार नातेवाईकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालयानेही स्पष्टीकरण दिले आहे. कुटुंबीयांनी कामकाजात हस्तक्षेप केला, महिला रुग्णालयात उशिरा आली, बाळ अपुऱ्या दिवसाचे होते, त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनानेही महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.