चंद्रपूरात बोंडअळीमुळे बाधित कापूस पिकाला हेक्टरी २५ हजारांची मदत द्या अशी मागणी

कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी आल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी,अशी मागणी महाराष्ट्र प्रांत शेतकरी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांचेकडे केली आहे.

राज्यातील कापूस उत्पादक असलेल्या २0 जिल्ह्यात यावर्षी परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर आलेल्या गुलाबी बोंडअळी मुळे पुन्हा कापूस पिकाचे नुकसान झाले. काही जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस येऊनही अतवृष्टीच्या नियमात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्यानंतर शेतकर्‍यांच्या हातात आलेले कापसाचे पीक गुलाबी बोंडअळीने फस्त केले. आधीच शेतकर्‍यांनी कर्ज घेऊन या पिकाची लागवड केली आहे. आता या पिकासाठी आलेला खर्च भरून निघेल की नाही, अशी परिस्थिती आहे. यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यासाठी खर्चिक किटकनाशकांची फवारणी करूनही कापूस पिकाचे उत्पन्न कमी झाले आहे. यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.

बोंडअळी आपदग्रस्थ शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार हेक्टर प्रमाणे किमान दोन हेक्टर साठी तातडीने मदत द्यावी,अशी मागणी मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप, प्रांताध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार सरोज काशीकर, शैला देशपांडे, राम नेवले, सतीश दाणी, गुणवंत हंगरगेकर, ललित बहाळे, मदन कामडे, मधुकर हरणे, विजय निवल, प्रभाकर दिवे, अरुण नवले, अँड. शरद कारेकर, रामभाऊ पारखी,जगदीशनाना बोंडे, गीता खांदेभराड, पौर्णिमा निरांजने, राजेंद्र ठाकूर, नीलकंठ कोरांगे, कवडू येणप्रेडीवार, सुधीर सातपुते, नीलकंठ गौरकार, तुकेश वानोडे, डॉ. संजय लोहे, कवडू बोंडे, दिनकर डोहे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.