पोळा-मारबद सणादरम्यान देवरी पोलिसांची राहणार कडक नजर

चिचगड,दि.06ः पोळा-मारबदच्या सणादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये तसेच कोरोना काळ असल्याने शासकीय नियमांचे उल्लघंन थांबविण्यासाठी देवरीचे पोलीस निरिक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी बंदोबस्त लावले असून  ३ वाहनासह सहा  पोलीस पथक अधिकारी-कर्मचारी यांचे तयार केले आहे.

देवरी शहर कायदा आणि सुव्यवस्थेचा दृष्टीने नेहमीच महत्वाचे राहिलेले आहे. पोळा सणादरण्यान जुगाराच्या घटना घडत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवरी पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी व अधिकारी रात्रभर बंदोबस्त करुन सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनांची तपासणी करणार असल्याचे पोलीस निरिक्षक सिंगनजुडे यांनी सांगितले.यासाठी प्रत्येक चौकावर पोलिसांची नजर राहणार आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.