उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या नागपूर दौर्‍यावर

सोमवारी घेणार नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या डीपीडीसीचा आढावा

नागपूर
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या रविवार ७ व सोमवार ८ फेब्रुवारी रोजी नागपूर दौर्‍यावर आहेत. ते रविवार ७ फेब्रुवारीला नागपुरातील विविध कार्यक्रमात सहभागी होतील तर सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची जिल्हा विकास आराखड्यांच्या राज्यस्तरीय बैठकी घेणार आहेत.
रविवारी ३ वाजता अजित पवार यांचे नागपूर येथे आगमन होणार आहे. यानंतर ते शासकीय निवास्थान असलेल्या देवगिरी येथे थांबतील. सायंकाळी ५ वाजता मुदलियार चौक शांतीनगर येथे पक्षप्रवेश कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. रात्री उशिरा एका लग्नसोहळ्यात ते सहभागी होणार आहे.
सोमवारी जिल्हास्तरावर पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांना (डीपीडीसी) मंजुरी देण्याबाबतची राज्यस्तरीय बैठक दुपारी ३.३0ते ६.३0 वाजेदरम्यान होणार आहे.
या बैठकीत विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा अशा अनुक्रमाने जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, वर्धाचे पालकमंत्री सुनील केदार, भंडारा पालकमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह विदर्भातील जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.