आठ दिवसांत विकासकामे सुरू करावीत, नाही तर पदांचे राजीनामे द्यावेत – शेळके

पुणे 7 सप्टेंबर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी तसेच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी येत्या आठ दिवसांत शहरातील प्रलंबित विकासकामांना सुरूवात करावी, अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या मागणीला सत्ताधारी भाजपने प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव नगरपरिषदेचे कामकाज बंद पाडण्यात येईल, असा इशाराही शेळके यांनी यावेळी दिला.

पत्रकार परिषदेला आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, नगरसेवक गणेश खांडगे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक अरूण माने, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, नगरसेविका हेमलता खळदे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे आदी उपस्थित होते.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.