देवेंद्र फडणवीस भाजपचे गोव्याचे प्रभारी

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं या निवडणुकांतील यशापयश सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ताधारी भाजपसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. या राज्यांतील निवडणूक रणनीती ठरविण्यासाठी भाजपनं देशभरातील अनुभवी व हुशार नेत्यांची निवड केली आहे. गोव्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडं देण्यात आली आहे. फडणवीस यांच्या याच अनुभवाचा उपयोग गोव्यात करून घेतला जाणार आहे. या राज्यात सध्या भाजपचीच सत्ता आहे. मात्र, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक भाजपची महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान काम पाहणार आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.