बिहार विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींना आणि कठोर परिश्रमी कार्यकर्त्यांना : देवेंद्र फडणवीस

मुंबई,  11  नोव्हेंबर 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  आणि विरोधीपक्षनेते तसेच बिहारचे निवडणूक प्रभारी  देवेंद्र फडणवीसांना बिहार तसेच अन्य राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल जनतेचे आभार मानले. एक विशेष संदेशात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “धन्यवाद बिहार! जनतेने हे स्पष्ट केले आहे की, त्यांना विकास हवा आहे जंगलराज नाही ! आमच्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर मोहर लावली असून नितीश कुमार यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखविला आहे. मी बिहारच्या जनतेचे कोटी-कोटी अभिनंदन आणि अभिवादन करतो.

बिहारमध्ये भाजपने 110 जागा लढविल्या आणि जितक्या जागा जिंकल्या त्याचे प्रमाण 67% असून जे 2015 मध्ये 34% होते. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीब कल्याण कार्यक्रमास  आणि  आमच्या सर्व कठोर परिश्रमी कार्यकर्ता वर्गास जाते. मी  बिहार भाजपच्या चमूस खूप शुभेच्छा देतो. संपूर्ण कोरोना काळात या निवडणुकीत उत्साहाने सगळ्यांनी सहभाग घेतला आणि जगापुढे उदाहरण ठेवले. यशस्वी निवडणूक संचालनासाठी निवडणूक आयोगाचा आभारी आहे.

देशात 11 राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले. बिहार सह या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वासाची लाट  आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणासह अन्य सर्व राज्यातील आमच्या भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन. सर्व निवडणुकांसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्व आणि मार्गदर्शनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी जे दिशा दर्शन आणि परिश्रम केले, आम्ही सगळे त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो.”

कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मागील आठवड्यात रुग्णालयातून  सुटी झाली असून काही दिवस ते एकांतात आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकांचे प्रभारी  होते. बरेच महिन्यांपासून  ते  रणनीती- प्रचारार्थ बिहार –दिल्ली असा प्रवास करीत होते. याच काळात त्यांना कोरोना संसर्ग झाला.

तीन भागात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण राज्यात एकूण 12 सभांना संबोधीत केले. नरेंद्र मोदी-नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजपला  74, जनता दल युनायटेड ला 43 तर व्ही आयपी आणि हम पक्षाला प्रत्तेकी  4 जागा जिंकता आल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आकडा 125 असून राष्ट्रीय जनता दल 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. कॉंग्रेसला 19 तर डाव्या पक्षांना 16 जागा जिंकता आल्या. महाआघाडीला 110 जागा प्राप्त झाल्या. असदुद्दिन ओवैसी यांच्या पक्षाने 5 बहुजन समज पक्षाने एक आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षास एक तसेच एका अपक्षास विजय संवादित करता आला. मंगळवारी सकाळी सुरु झालेली मतमोजणी जवळपास बुधवारी पहाटे 4 वाजेपर्यंत चालली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.