हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई : इगो सोडा, सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये दिलेली जागा वापरा, असा सल्ला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. हायकोर्टाने  राज्य सरकारला अक्षरश: सांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.

राज्य सरकारने एमएमआरडीएला दिलेले आदेश चुकीचे असल्याचं मी कालच सभागृहात सांगितलं होतं, हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता कांजूरमार्गमध्ये काम होऊ शकत नाही. समजा ती जमीन क्लीअर असती, तरी कारशेड तिथे नेणं चुकीचंच आहे, असा सौनिक समितीचा अहवाल होता. मग राज्य सरकारचा अट्टाहास का? असा सवाल फडणवीसांनी विचारला.

“इगो सोडा आणि आरेची जागा वापरा” राज्य सरकारला अक्षरश:

इगोसाठी मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करत आहे, इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली आरेची जागा वापरा, असं आवाहन फडणवीसांनी केलं. राज्य सरकारला कोर्टाने अक्षरशः चपराक दिली आहे. मुंबईच्या मेट्रोत मिठाचा खडा टाकू नका, असं सरकार म्हणतं, पण राज्य सरकारच्या निर्णयामुळेच यात मिठाचा खडा पडला, अशी टीकाही फडणवीसांनी केलं

“तरी आरेमध्ये काम करावंच लागलं असतं…”

जी मुंबई मेट्रो 2021 पर्यंत मुंबईकरांना मिळणार होती, ती आता 2024 पर्यंत लांबली आहे. फक्त राज्य सरकारच नाही, तर केंद्राचाही यामध्ये 50 टक्के वाटा आहे. केंद्रीय समितीकडूनही पत्राद्वारे मेट्रो कारशेड हलवण्यास नकार देण्यात आला होता. कांजूरमार्गला कारशेड नेलं असतं, तरी आरेमध्ये मेट्रो रॅकचं काम करावंच लागलं असतं, असं फडणवीस म्हणाले.

“आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबाच देऊ”

राज्य सरकारने आरेमध्ये बांधकाम सुरु करावं, आम्ही पाठिंबाच देऊ, कोणीही जिंकलं-हरलं असं म्हणणार नाही, मुंबईकर जिंकले पाहिजे, आदित्य ठाकरे युवा नेते आहेत, ते चांगलं काम करतात, मात्र त्यांनी अभ्यास केला पाहिजे, अहवालाचं वाचन केलं पाहिजे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. (Devendra Fadnavis on Thackeray Govt over Kanjurmarg Metro Car Shed)

“हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे”

तुम्ही योग्य निर्णय घेतलेत, तर कोर्टात जरुर जिंकाल, पण मनमानी केलीत… कोणी आमच्याविरुद्ध बोललं, तर त्याचं घर तोडू, तर कोर्ट कसं सहन करेल, त्याचं स्पष्टीकरण कसं द्याल, कायदेशीर काम कराल, तर कोर्ट तुमच्या विरोधात जाणार नाही, पण काल मी सभागृहातच सांगितलं, की बेकायदेशीर काम केलंत, इथे लोकशाही आहे, इथली न्यायालयं मजबूत आहेत, हे पाकिस्तान नाही, ज्याच्या मनात जे येईल ते कराल, हा भारत आहे, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य आहे, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारला धारेवर धरलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.