धुळे – कार अपघात तरुण ठार, ३ जखमी

धुळे, 9 सप्टेंबर भरधाव स्विप्ट डिझायर कारने समोरुन येणार्या झेन कारला कट मारल्याने झेन कार रस्त्याच्या कडेला जावून उलटल्याने फागणे ता.धुळे येथील एक तरुण जबर जखमी होवून ठार झाला तर इतर तिघे जखमी झाले.

ही घटना नुकतीच अमळनेर रोडवरील नवलनगर जवळ घडली. जयेश सांळुखे हा झेन मोटर कार क्र. एमएच ०४- बी.के.६४९४ घेवून अमळनेरच्या दिशेने जात होता. सोबत चुलत भाऊ शुभम जितेंद्र सांळुखे (वय २०) तसेच गल्लीत राहणारे नितीन छोटू धनगर, शिवाजी सुकदेव पाटील हे होते. अमळनेर फाटा ते अमळनेर रोडवर नवल नगरच्या अलीकडे संजय साखर कारखान्यासमोर पाऊस चालू असतांना समोरुन येणार्या मारुती सुझुकी स्वीप्ट डिझायर कार क्र. एमएच ०४- इ.एच. ७०५७ वरील अनोळखी चालकाने भरधाव कार चालवत आणून झेन कारला समोरुन कट मारला. त्यावेळी जयेश साळुंखेने गाडी डाव्या साईटला घेतली असता रोडच्या बाजुला कार पलटी झाली. यात ड्रायव्हर शेजारी बसलेला शुभम जितेंद्र सांळुखे हा जबर जखमी होवून ठार झाला. तर जयेश सांळुखे, नितीन धनगर, शिवाजी पाटील हे तिघे तरुण जखमी झाले. अपघातानंतर कट मारणारा स्वीप्ट कार चालक पळून गेला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.