आयरलॅण्ड येथून आलेला युवक बाधित

Share This News

नागपूर
ब्रिटेनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन दिसल्यानंतर अनेक देश हे या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत. दरम्यान, ब्रिटनमधून अनेक विमाने ही मुंबई तथा नागपूर शहरात आली आहे. या विमानातून आलेले काही प्रवासी हे कोरोना बाधित आढळून आले आहेत. हे प्रवासी आधीच बाधित होते की, इकडे आल्यानंतर बाधित झाले असा प्रश्न आरोग्य यंत्रणेपुढे आहे. मात्र, विदेशातील प्रवासी हे बाधित आढळून येत असल्यामुळे शहरातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची शक्यता वाढली आहे. आयरलॅण्ड येथून एक युवक १४ डिसेंबर रोजी नागपूर शहरात आला होता. त्याची २६ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर कोरोना टेस्ट ही पॉझिटिव्ह आल्यानंतर भीती वाढली आहे.
आतापर्यंत पुणे येथे पाठविण्यात आलेल्या कुठलाही रिपोर्ट या नव्या कोरोना विषाणूसंदर्भात आलेला नाही. राज्य शासनाकडून नव्या कोरोना स्ट्रेन बाबतच्या सतर्कतेमुळे शिवाय वेळीच आवश्यक निर्णय घेतल्यामुळे आतापर्यंत तरी राज्यासह नागपूर शहरात कोरोनाचा नवा प्रकार दिसून आलेला नाही. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयरलॅण्ड येथून आलेला हा युवक १४ डिसेंबरनंतर जाजंगिर, बिलासपूर छत्तीसगढ येथील निवासी आहे. काही महिन्यांपासून आयरलॅण्डची राजधानी डबलीन येथे राहत होता. येथून हा युवक २७ नोव्हेबर रोजी, लंडन येथे पोहचला. २८ नोव्हेबर रोजी तो सकाळी ६.३0 वाजता लंडन येथून दिल्ली पोहचला. येथे सात दिवस क्वारंटाईन राहण्याचा त्यास सल्ला दिला गेला होता. परंतु, त्याच दिवशी तो रायपूर येथे पोहचला. येथे हा युवक सात दिवस क्वारंटाईन होता. त्यानंतर तो ६ डिसेंबर रोजी जांजगिर येथील एका लग्न समारंभात गेला होता.
पुढील चार दिवसानंतर तो १0 डिसेंबर रोजी पत्तथल येथे फिरायला गेला होता. येथे काही दिवस तो थांबला. त्यानंतर तो १४ डिसेंबर रोजी नागपूर शहरात आला. शहरातील मांजीगल्ली, किला रोड महाल येथे आला होता. तेव्हा पासून तो नागपूर शहरातच राहत होता.
या व्यक्तीची महापालिकेने माहिती मिळविली. २६ डिसेंबर रोजी त्याला आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगण्यात आले. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.