डॉन अरुण गवळी घेतोय कला शाखेतून पदवीचे शिक्षण

नागपूरः नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डॉन अरुण गवळी हा सध्या मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे.
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील दोनशेवर कैदी सध्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यापैकी त्यात १४७ महिलांचा समावेश आहे. या कैद्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इग्नुमध्ये अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. यात डॉन अरुण गवळीही आहे. गवळी हा सध्या नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कैद्यांना विद्यापीठांमधून टपालने पुस्तके पाठविली जातात. त्यांची परीक्षा कारागृहांमध्येच घेतली जाते. त्यासाठी कारागृहांना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.