डॉ मुरुगन यांनी घेतली राज्यपाल पुरोहित यांची भेट

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ लोकनाथन मुरुगन यांनी मंगळवारी तमिळनाडू आणि पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची दिल्ली स्थित तमिळनाडू भवनात सदिच्छा भेट घेतली.

डॉ मुरुगन यांनी पुरोहित यांचे पारंपरिक अंगवस्त्र देऊन स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी मुखकवच आणि सामाजिक अंतराचे पालन करीत विविध विषयांवर चर्चा केली. डॉ लोकनाथन मुरुगन यांनी ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.