अमरावती : जिल्हा न्यायालयात पक्षकारांकरिता ई-सेवा केंद्राची स्थापना

अमरावती, ४ जानेवारी : न्यायालयात पक्षकारांकरिता आणखी एक अत्याधुनिक सुविधा निर्माण करून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या तळमजल्यावर ई-सेवा केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या ई-सेवा केंद्राचे उद्घाटन 4 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयात कार्यरत सर्व नायिक अधिकारी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष,जिल्हा शासकिय अभियोक्ता व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. या ई- सेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी उद्घाटनाप्रसंगी केले. 

पक्षकारांना ई-सेवा केंद्रात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची सद्याची स्थिती, पुढील तारीख, प्रमाणित नक्कल प्रति करीता ऑनलाईन अर्ज करण्याची व्यवस्था, दिवाणी प्रकरण दाखल करण्याची सुविधा, ऑनलाईन ई-मुद्रांक खरेदी, सदर सुविधेच्या माध्यमातून तुरुंगात असलेल्या व्यक्तींना त्यांचे नातेवाईकांची भेटी घालून देण्याकरिता ई-मुलाकात सुविधा, राष्ट्रीय विधी सेवा, राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत समाजातील दुर्बल घटकांना पुरविण्यात येणार्या न्यायविषयक सहाय्य याबाबतची माहिती आणि ई-कोर्ट अंतर्गत येणार्या सर्व डिजिटल सुविधांबाबत माहिती अशा सुविधा ई-सेवा केंद्रातून पुरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.