अनिल देशमुखांशी संबंधित व्यापारी आणि सीएंवर ईडीचे छापे

Share This News

नागपूरः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कोळसा व्यापारी आणि दोन सीएंवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकून झडत्या सुरु केल्या आहेत.
नागपुरातील कोळसा व्यापारी अग्रवाल आणि सीए बाहेती आणि पंजवानी यांच्याशी संबंधित प्रतिष्ठानांवर छापे घालण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबईमधून आलेल्या पथकाने नागपुरात दाखल होताच एकाच वेळी ही कारवाई सुरु केली असून ती आणखी बराच वेळ सुरु राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते तीनही व्यवसायी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असल्याचा दावा ईडीतील अंतर्गत सूत्रांनी केला आहे.
देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने यापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ईडीने देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत २५ मे रोजी सागर भटेवरा याच्यासह एकूण तिघांवर छापे घालून झडत्या घेतल्या होत्या. हे तिघेही देशमुख यांचे सुपूत्र सलील यांचे मित्र असल्याचे सांगितले जाते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.