परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची दुसऱ्यांदा समन्स


मुंबई, २५ सप्टेंबर: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात परब यांना याआधी त्यांना ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.