मंचर ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार, एकनाथ शिंदेची घोषणा

Share This News

एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आल्याची घोषणा केली.

पुणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या प्रसंगी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. (Eknath Shinde said Manchar Gram Panchayat converted into Nagara Panchayat)

मंचरची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एकवीस हजार 841 असून महापालिका अथवा वर्ग नगरपालिका पासून वीस किलोमीटरच्या आत मंचर ग्रामपंचायत येत नाही. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 341 क मधील तरतुदीनुसार कृषी रोजगाराची टक्केवारी 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असणे गरजेचे असून मंचरच्या बाबतीत हे प्रमाण ५९.१५% असल्यामुळे सदर ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्याचे सर्व निकष पूर्ण होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. Eknath Shinde said Manchar Gram Panchayat converted into Nagara Panchayat

कांजूरची जागा कागदोपत्री महाराष्ट्राची

मेट्रो कारशेड प्रकरणी बीकेसी जागेबाबत आढावा घेतला जात आहे. पण, प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर काही बोलता येत नाही. कांजूर कारशेड प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर आम्ही विचार करत आहोत. यामध्ये राजकारण आणण्याचं प्रयत्न होत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला. काजूंरची जागा कागदोपत्री महाराष्ट्र सरकारची असल्याचे दिसत आहे. विरोधकांनी सुद्धा याप्रकरणी सहकार्य करावे, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित निवडणुका लढवत आहोत आणि भविष्यातही कार्यकर्त्यांशी संवाद साधून एकत्रित कार्यक्रम राबवू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायत निवडणूक एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरण वेगळं असतं. ग्रामंपचायत निवडणूक ही चिन्हावर लढवल्या जात नाहीत.सरपंच निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होईल, असं एकनाथ शिंदेनी स्पष्ट केले. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदेनी केला.

शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या:अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना ‘शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या’, असे निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी शिवसेनेसोबत कायम राहायचे असल्याचे सांगतिले. महाविकास आघाडी‌ झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे, असंही ते म्हणाले. महामंडळांचे वाटप लवकरच करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.