उमेदवाराच्या अपहरणामुळे ‘या’ गावातील निवडणूक अविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरु असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चक्क एकाचे अपहरण केल्याची घटना नागपुरात समोर आली आहे, या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत पेठ ग्रामपंचायत  निवडणुकीसाठी रामभाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवार ४ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यादिवशी सकाळी १० वाजता एका आरोपीने त्याला घरातून कारमध्ये बसवून धामना गावात नेले. तिथे आरोपीच्या तीन साथीदारानी त्यांना दारू पाजली. तेथून नागपूर तहसील कार्यालयात नेऊन अर्ज मागे घ्यायला लावला. त्यानंतर त्याला दूर सोडून देण्यात आले. झालेल्या घनतेनंतर रामभाऊ पवार यांनी हिंगणा पोलीस स्टेशन मध्ये चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाल्या बावणे, दीपक करवा, पुरुषोत्तम सोनावणे व मनोहर येलेकर यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. मात्र रामभाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पेठ ग्रामपंचायत मधील एका वॉर्डात निवडणूक अविरोध झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.