गुन्ह्यांची माहिती गोपनीय ठेवण्यावर भर?

नागपूर : गंगाजमुनाला बळजबरी सील केल्यानंतर आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी दडपण्याचाही चंग बांधला आहे. मात्र त्याची माहितीच पोलिस अधिकार्‍यांकडून दिली जात नसल्याने या गोपनीयतेचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची माहिती पोलिस प्रेस नोटच्या माध्यमातून दिली जाते. पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर हे प्रेस बुलेटिन प्रसारित केले जाते. मात्र यात निवडक गुन्ह्यांचीच माहिती असते. अत्याचाराच्या घटनांची माहिती दिली जात नाही. आर्थिक गुन्ह्य़ांचे, लुटमारीचे, विनयभंगाचे आणि अत्याचाराच्या घटना वाढत आहे. पोलिस गुन्हे पत्रकात मात्र क्षुल्लक चोरी, दुखापत, अकस्मात मृत्यू यांसारख्या लहानसहान गुन्ह्य़ांचीच माहिती देण्यात येत आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.