आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर

Share This News

नागपूर
आदिवासी समाजबांधवांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या बेरोजगारीसोबत शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे. हा सोडविण्यावर भर राहणार आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली.
नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असताना ते रविभवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे झिरवाळ यांनी सांगितले की, आदिवासींच्या समस्या निकाली काढण्यासाठी आदिवासी भागात सिंचनाची सोय करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना शेतीस मदत होईल. यासाठी लहान प्रकल्प हाती घेण्याच्या सूचना विभागाला करण्यात येईल. आदिवासींसाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डीबीटीला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. आदिवासीमंत्री वळवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे मतही डीबीटीच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. अनुसूचित जमाती, जाती, इतर मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांचा आहे. हा निकाली काढण्यास मंत्रिगटाने मंजुरी दिली आहे. लवकर पदोन्नती देण्यात येईल, असे ते म्हणाले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.