राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये उपजीविका निर्मितीची चळवळ

चंद्रपूर 7 सप्टेंबर :- कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाने “उद्यमिता” प्रकल्प सुरु करण्यासाठी लेट्स एन्डोर्स डेव्हलपमेंटसह करार केला आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक विभागात एक याप्रमाणे उपजीविका निर्मितीची चळवळ सुरू केली आहे.दरम्यान“उद्यमिता” प्रकल्पाच्या माहितीसाठी तरुण-तरुणींना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“उद्यमिता” प्रकल्प रायगड, नाशिक, पुणे, यवतमाळ, नांदेड, आणि चंद्रपूर जिल्ह्यात तसेच राज्यभरात वेगाने विकसित होण्याच्या दृष्टीने आणि उत्साही तरुण-तरुणींना स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आधारभूत प्रणाली उपलब्ध करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आला आहे.

युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नोकरीच्या शोधात येण्याऐवजी त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायक आणि सक्षम बनवून योग्य दिशेने एक पाऊल उचलायला प्रेरित करणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे असे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यातील युवक-युवतींनी उद्यमिता प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी 7530057575 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रोग्राम ऑफिसर शंतनु भडवळकर 9657692217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी स्पष्ट केले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.