संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस, चौकशी होणार

मुंबईः शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक, भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे ( eknath khadse ) यांच्यानंतर आता ईडीने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ( varsha raut ) यांना नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ईडीने २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप यांच्यात राजकीय द्वंद्व पेटल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीकडून अभिनेत्री कंगना राणावत आणि रिपब्लीक भारत टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तर आता केंद्राकडून शिवसेना नेते प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या मंगळवारी २९ डिसेंबरला त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.