राज्यात टास्क फोर्सची निर्मिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबई: संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.