किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबईः शिवसेनेचे घोटाळे बाहेर काढले म्हणून मला रोज धमक्या दिल्या जात आहेत. दाऊदला पाठवले तरी मी घाबरणार नाही. मी घोटाळे बाहेर काढण्याचे काम करीतच राहणारे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला.
सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला. मी मुख्यमंत्र्‍याच्या विरोधात बोलत असल्याने शिवसेनेचे गुंड मला रोज धमक्या देत असल्याचा आरोप करून सोमय्या म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला जबाबदार आहोत. त्यामुळे कितीही धमक्या मिळाल्या तरी आपण घोटाळे बाहेर काढण्याचे काम सोडणार नाही, असे सोमय्या म्हणाले.
सोमय्या यांना झेड सुरक्षा
दरम्यान, किरीट सोमय्या यांना मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेड सुरक्षा पुरविण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांना सीआयएसएफच्या ४० जवानांची सुरक्षा पुरविली असून ही सुरक्षा व्यवस्था आजपासूनच लागू झाली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.