७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना ITR मधून मुभा | Exemption from ITR for pensioners above 75 years of age

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता करात सवलत देण्यात आली आहे. ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना आता ITR भरणं अनिवार्य नसेल. परंतु केवळ पेन्शनचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही स्कीम लागू असणार आहे. “एनआरआय नागरिकांना अनेकदा कर भरण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु यावेळी त्यांना डबल टॅक्स सिस्टमधून सूट दिली जाणार आहे,” असं सीतारामन म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी स्टार्टअप्सनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या स्टार्टअप्सना कर देण्यातून सुरूवातीला सूट देण्यात आली होती ती आता ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.