शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

नागपूर : सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ ३१ जानेवारीपर्यंत देण्यात येत आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी योजनेच्या अटीनुसार संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच पात्र विद्यार्थी व महाविद्यालयांनी अर्ज नोंदणी करावी. नोंदणीकरण विशिष्ट कालावधीसाठी असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.