वर्ण भेदभाव प्रकरणी फेसबुक पुन्हा अडचणीत, मागितली माफी

न्यूयॉर्क
फेसबूककडून कृष्णवर्णीय नागरिकांची दिशाभूल केल्याबद्दल पुन्हा एकदा फेसबूक अडचणीत सापडले आहे. ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही फेसबूकने २0१५ मध्ये, दोन कृष्णवर्णीय लोकांच्या फोटोला गोरिल्ला म्हणून लेबल लावल्यानंतर गुगलने माफी मागितली होती. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा फेसबुक अडचणीत आले आहे.
न्यूयॉर्कच्या अहवालानुसार, ज्या वापरकर्त्यांनी अलीकडच्या काळात सोशल नेटवकिर्ंग प्लॅटफॉर्मवर कृष्णवर्णीय नागरिकांच्या व्हिडिओंना प्राइमेट असे लेबल लावले. त्यानंतर फेसबुकला खूप वाईट प्रतिक्रिया आल्या. फेसबुक युझर्सनी द डेली मेलने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर हा वाद उघड झाला. ज्यामध्ये मरीना येथे कृष्णवर्णीय लोक व श्‍वेतवर्णीय नागरिक पोलिस अधिकार्‍यांशी भांडताना दिसत होते. मात्र हा व्हिडिओ पाहताना फेसबुककडून स्वयंचलित संकेत येतो. त्यात विचारले जात होते की त्यांना प्राइमेट्स व्हिडिओ बघायचे आहेत का?
एखाद्या वापरकर्त्याने क्लिप पाहणे संपवल्यानंतर, फेसबुककडून हा व्हिडिओ पाहण्याबद्दल अभिप्राय मागितला तेव्हा हा मेसेज पॉप अप झाला. फेसबुककडून अनेकदा वापरकर्त्यांचे फीड सुधारण्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया मागविण्यात येतात, मात्र कृष्णवणीर्यांच्या व्हिडिओंवरील एआय अल्गोरिदम संदेशाने आता वाद निर्माण केला आहे. खरे सांगायचे झाले तर २७ जून २0२0 च्या व्हिडिओचा प्राइमेट्सशी काहीही संबंध नव्हता. ही घटना उघडकीस आल्यानंतर फेसबुकने कृष्णवणीर्यांच्या व्हिडिओंना प्राइमेट म्हणून लेबल लावल्याबद्दल माफी मागितली आणि म्हटले की त्याने आता त्याचे आर्टिफिशियल इंटिलेजंस फिचर बंद केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या निवेदनात फेसबुकने या चुकीला अस्वीकार्य त्रुटी असे म्हटले आहे आणि आर्टिफिशियल इंटिलेजंस फिचरची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.