पोलिस महासंचालक सुबोध जयसवाल यांच्या प्रतिनियुक्तिवरून फडणविसांचा हल्लाबोल | Fadnavis’s attack on the deputation of Director General of Police Subodh Jaiswal

Share This News

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल यांच्या केंद्रातील प्रतिनियुक्तिवरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. पोलिस महासंचालक प्रतिनियुक्तिवर जाण्याची ही पहिलीच घटना असून महासंचालकांच्या प्रत्येक गोष्टीत राज्यासरकारने हस्तक्षेप केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी केंद्रीय कॅबिनेटने सुबोध कुमार जयसवाल यांची विनंती मान्य करीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली. परंतु राज्यात सत्ताबदल झाल्यापासून पोलिसांच्या बादल्यांपासून प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार हस्तक्षेप करीत आहे, महासंचालकांना विश्वासात घेतले जात नाहीय, जयमुले नाराज होऊन जयसवाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्ति मागितल्याचा  आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोलिस विभाग हा गृहविभागाच्या अंतर्गत येत असला तरी तो एक स्वतंत्र विभाग आहे, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच कार्य सुपरविजन आहे. परंतु आता अगदी छोट्या-छोट्या बदल्यांपासून पोलिस विभागाच्या अनेक कार्यात सरकारचा हस्तक्षेप सुरू असल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला. पोलिस विभागाच्या मनोबलावर  यामुळे परिणाम होईल तसेच चांगली व कार्यक्षम अधिकारी घालवणे हे राज्यासाठी चांगली बाब नसल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Fadnavis’s attack on the deputation of Director General of Police Subodh Jaiswal


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.