नवी मुंबई : डॉक्टर असल्याचे सांगून महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला अटक

डॉक्टर असल्याचे खोटे सांगून महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एरीक अंकलेसारिया असे आरोपीचे नाव आहे. 
 मिळालेल्या माहितीनुसार, एरीक अंकलेसारिया हा फिजीओथेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करत होता. एका महिला कर्मचाऱ्याने अज्ञाताविरोधात तक्रार केली होती.

तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. 
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी भांडूप येथे राहणाऱ्या एरीक अंकलेरिया याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात नवी मुंबई , ठाणे, मुंबई येथे विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.