फेमस भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन

नवी दिल्ली
‘चलो बुलावा आया है’फेम, भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात निधन झाले आहे. ते ८0 वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कलाविश्‍वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दु:ख झाल्याचे गायक दलेर मेहेंदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. नरेंद्र यांचे बॉलिवूड करिअर हे अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत सुरु झाले होते. त्यांनी बॉबी चित्रपटातील बेशक मंदिर मस्जिद तोडो हे गाणे गायले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. पण त्यांना अवतार या चित्रपटात गायिलेले चलो बुलावा आया है या भजनाने खरी ओळख मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना व्हायरसवर देखील एक गाणे गायले होते आणि हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.