प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाकडून पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारे प्रसिद्ध गायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीदेखील बालसुब्रमण्यम यांनी गाजवली.

आपल्या आवाजाने अनेकांना एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी भूरळ घातली होती. त्यामुळे त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. अभिनेता सलमान खान याचा आवाज म्हणून बालसुब्रमण्यम यांना खास ओळखले जात होते. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सलमानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.