एका दिवसाला किती शेतकऱ्यांची आत्महत्या?

Share This News

पश्चिम विदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर   farmers-suicide-still-continues-in-vidarbha-read-shocking-numbers

अमरावती : सतत होणारी नापिकी, बियाणे कंपन्यानी माथी मारलेलं बोगस बियाणं, कर्जाचा डोंगर त्यात बिनभरवशाची शेती, निसर्गाचा लहरीपणा या साऱ्याचा मारा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. मुख्य म्हणजे याच दृष्टचक्राच्या विळख्यात अडकुन अखेर हा बळीराजा आत्महत्येचं पाऊल उचलतो.

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या याच सत्राची आकडेवारी सध्या समोर आली असून, ही आकडेवारी दाहक वास्तवाची जाणीव करुन देत आहे. आतापर्यंत येथे ८७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्यात ५१ शेतकऱ्यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या केल्याचं वास्तव समोर आलं आहे. 

यंदा बियाण्यांन घात केला. सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यत पोहचत नसल्यामुळं या विवंचनेतुन एकट्या पश्चिम विदर्भात मागील १० महिन्यात तबल ८७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याची सरासरी काढली असता दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत.

सदर परिस्थिती सुधारत नसल्यामुळं शेतकरी आत्महत्याच्या थांबायच नाव घेत नाहीत. यावर्षी तर निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची पुरती वाट लावली. त्यात शेतकऱ्यांच्या मालाला मिळनारा बेभाव यातुन शेतकरी आता टोकाचे पाऊल उचलत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.