१ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ अनिवार्य

आजवर २.१६ कोटीवर फास्टॅग जारी
सेतु भारतम योजनेअंतर्गत ३१६ कोटींचे ९ उड्डाणपूल बनविण्यात येत आहेत. आगामी १ जानेवारीपासून फास्टटॅगने सर्व पथकर स्वीकारला जाणार आहे. जीपीएस प्रणाली येत्या दोन वर्षात संपूर्ण देशभर लावली जाणार आहे. त्यामुळे कुठेही पथकर केंद्र राहणार नाही. पथकराची रक्कम संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यातून वळती केली जाईल. २0२0 पासून आतापयर्ंत २ कोटी १६ लाख फास्टटॅग जारी करण्यात आले आहेत. खासदार आणि आमदारांनी दिलेले महामार्गांचे प्रस्ताव स्वीकारणात आले असून काही रस्त्यांच्या बांधकामात भूसंपादनाच्या व अतिक्रमणाच्या अडचणी राज्य शासनाने सोडवाव्या. त्यशिवाय ही कामे सुरू होणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
देशात १ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ अनिवार्य आहे. रस्ते चांगले बनले तरच पर्यटक अधिक येऊन पर्यटनाला चांगला वाव मिळेल. परिणामी रोजगाराच्या संधी वाढतील. राजस्थानमध्ये पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाव असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी के ले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गांच्या ८५00 कोटींच्या १८ योजनांचे गडकरींच्या हस्ते आज लोकार्पण व कोनशिला अनावरण पार पडले. व्हिडिओ कॉन्सफरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोद, राज्यमंत्री डॉ. व्ही. के.सिंग, अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र शेखावत, कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आदी उपस्थित होते. आज झालेल्या कार्यक्रमात ६४२८ कोटी रुपयांच्या ८२0 किलोमीटर रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले, तर १९१३ कोटी रुपये खर्चाच्या ३0५ किलोमीटर रस्त्यांच्या कामाचे कोनशिला अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, २0१४ ते २0२0 या सहा वर्षाच्या काळात राजस्थानमधील रस्त्यांच्या लांबीमध्ये ४0 टक्के वाढ झाली आहे. राज्यातील सर्व ३३ जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे. राज्यात गेल्या सहा वर्षात ७३५८३ कोटीच्या ७९0६ किमीचे १८६ कामे स्वीकृत करण्यात आली आहेत. तसेच ३0 हजार कोटी खर्च करून ५१५४ किमी लांबीचे महामार्गांचे काम पूर्ण करण्यात आले आहेत

एक लाख कोटींची कामे सुरु असून काहींचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.
आगामी २0२१-२२ मध्ये ३५ हजार कोटींच्या २७00 किमी लांबीची महामार्गाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. तसेच ५0 हजार कोटींच्या २८११ किमीच्या कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत. भारतमाला परियोजनेअंतर्गत ३२ हजार कोटींचे १९७६ किमीचे महामार्ग राज्यात तयार करण्यात येतील, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले. दिल्ली-मुंबई ग्रीन एक्स्प्रेस महामार्गाचे ७४ हजार कोटींचे काम असून यापैकी ६७0 हेक्टरमध्ये रोडच्या बाजूला विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगताना गडकरी म्हणाले, दिल्ली मुंबई एक्स्प्रेस महामार्ग ३७४ किमी राजस्थानमधून जात असून ३६६ किमीच्या कामाचे अवॉर्ड झाले आहे तसेच १६९ किमीचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय अमृतसर जामनगर आणि चंबल एक्सप्रेस महामार्ग हे दोन एक्सप्रेस महामार्ग राजस्थानातून जात आहेत. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सन २000 पासून आतापयर्ंत ६५५६ कोटी रुपयांची कामे स्वीकृत करण्यात आली असून ४५७४ कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहे. यावर्षी १000 कोटींच्या केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत आलेल्या महामार्गांच्या प्रस्तावांना मंजूर करण्यात आले आहे.पान १ वरून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.