अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कन्हान : पोलिस स्टेशनअंतर्गत कोळसा खदान ४ नंबर येथील अल्पवयीन मुलीचे आरोपीशी प्रेमसंबध असल्याचे कुटुंबीयांना माहीत झाल्याने पीडिताने उंदीर मारण्याचे औषध प्राषन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून आरोपी अशोक टेकाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वेकोलि कोळसा खदान नंबर ४ येथील पीडित फिर्यादीशी विरू अशोक टेकाम (वय २३) रा.खदान नंबर ४ यांचे ३ वर्षांपासून मैत्रीचे संबंध असून घरच्यांना प्रेमंसंबध असल्याचे समजल्याने पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने २ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता उंदीर मारण्याचे औषध प्राषन केले. आरोपी विरू टेकाम याने पीडिता अल्पवयीन असल्याचा फायदा घेत २९/0९/२0१८ ते २९/१२/२0२0 दरम्यान खदान नं. ६ येथील मित्राच्या रूमवर मुलीच्या र्मजीने एकदा शारीरिक संबंध केले. असे फिर्यादी पीडितेच्या तक्रारीवरून कन्हान पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पो. निरीक्षक नंदा पाटील यांनी कलम ३७६ भादंविसह कलम ४ पोस्को अँक्ट २0१२ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.