नागपूर विमानतळाबाहेर शॉर्ट सर्किटमुळे आग

Share This News

नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेर असलेल्या पिलरमधून धूर येऊ लागला. बुधवार, १९ मे रोजी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे हा धूर येत असल्याचे निदर्शनास आले. पिलरवर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली, असे सांगण्यात येत आहे. आगीमुळे काही वेळासाठी विमानतळावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. विमानतळाबाहेर काही कालावधीसाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन अग्निशमन वाहन तिथे तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पिलरवर असलेले अॅल्यूमिनियमचे पत्रे कापले. त्यानंतर काही मिनिटांत विमानतळावरील अग्निशामक यंत्रणेने ही आग विझविली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.