धक्कादायक- रुग्णालयासहीत अनेक रुग्णालयाचे फायर ऑडिट कित्तेक वर्षापासून नाही

भंडारा येथे रात्री सामान्य रुग्णालयात 10 लहान बालके आग लागल्याने दगावली आहेत. या घटनेने राज्यातील सर्व सामान्य रुग्नालयाचे फायर ऑडिटचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेच्या धर्तीवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्नालयाचे 2016 पासून फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे अश्या सूचना केल्या होत्या. मात्र, कुठेही फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे.

राज्यात सातत्याने अनेक सामान्य रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार दरवर्षी फायर ऑडिट करुण घेणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कक्षात फायर सिलेंडर लावल्याचे दिसून आले. तर अतिदक्षता विभागात कुठेही फायर सिलेंडर लावलेले दिसून आले नाही. माहिती घेतली असता अतिदक्षता विभागात फायर सिलेंडर नाही असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.