बनावट कोरोना अहवाल प्रकरणी पहिली अटक

हरीद्वार
हरिद्वार कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल सादर करण्यात आल्याच्या आरोपाबद्दल उत्तराखंड सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. याला आता यश मिळताना दिसत आहे. एसआयटीने याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी डेटा फिडिंगच काम करत होता. त्यात त्याने कोरोना चाचणी झाली नसताना पोर्टलवर बनावटट एँट्री केल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. एकूण २४ खासगी लॅब्ज कुंभमेळ्यादरम्यान सहभागी भाविकांच्या कोरोना चाचण्या करत होत्या. त्यापैकी १४ जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या होत्या तर १0 कुंभमेळा व्यवस्थापनाच्या होत्या. उत्तराखंड उच्च न्यायालयाने सांगितले होते की कुंभमेळ्यादरम्यान ५0, 000 चाचण्या करण्यात आल्या होत्या.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.