कोरोना पसरविल्याच्या आरोपात पाच वर्षांचा कारावास

व्हिएतनाम
कोरोना विषाणूमुळे जगात भीती निर्माण केली आहे. या धोकादायक विषाणूमुळे संपूर्ण जगभरात निबर्ंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा भयानक टप्पा आता कमी झाला तरीही अनेक देशांमध्ये त्याबद्दल सावधगिरी बाळगली जात आहे. असाच काहीसा प्रकार व्हिएतनाममध्ये घडला आहे. व्हिएतनाममध्ये एका माणसाला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे कारण त्याच्यावर कोरोनाचे नियम जाणूनबुजून मोडण्याचा आणि इतर लोकांमध्ये कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप आहे करण्यात आला आहे. शिक्षा सुनावण्यात आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हिएतनाममधील माध्यमांनी सांगितले की या व्यक्तीचे नाव ले व्हॅन ट्राय आहे. या व्यक्तीने कोरोनाचे नियम मोडले आणि हा धोकादायक विषाणू इतरांमध्ये पसरवला. पोलिसांनी सोमवारी त्या व्यक्तीला अटक आणि त्याला पाच वर्षांसाठी तुरुंगात टाकले. हा निर्णय प्रांतीय लोक न्यायालयाने दिला आहे. व्यक्तीचे सर्व युक्तिवाद ऐकूनही त्याच्या विरुद्ध निर्णय दिला गेला आहे.
माध्यमांनुसार, जुलैमध्ये जेव्हा त्या व्यक्तीचे शहर कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट होते तेव्हा तो माणूस त्याच्या घरातून मुक्तपणे फिरू लागला. एवढेच नाही तर यानंतर त्याने आणखी एक कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणापर्यंत प्रवास केला. प्रशासनाने तेव्हा प्रवासावर पूर्णपणे बंदी होती. ले वॅन ट्रायने यावेळी प्रवास केल्यानंतर इतर लोकांमध्ये कोरोना पसरवला होता असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले. २८ वर्षीय व्हॅन ट्रायवर दक्षिणेकडील भागांतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यावेळी व्हॅन ट्राय क्वारंटाइनमधून पळून गेला होता. ७ जुलै रोजी व्हॅन ट्राय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि नंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. न्यायालयात असेही सांगण्यात आले की आरोपींनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आणि ७ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीचा मृत्यूही झाला. यासाठीही व्हॅन ट्रायला जबाबदार धरण्यात आले होते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमुळे सुमारे दहा जण गंभीर आजारी पडल्याचा अंदाज आहे. सध्या व्हॅन ट्रायला आता शिक्षा झाली आहे. सर्व इशार्‍यांकडे दुर्लक्ष करून व्हॅन ट्रायने कोरोना नियमांचे उल्लंघन केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच वर्षांसाठी तुरुंगात पाठवले आहे. सध्या व्हिएतनाममध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर होत आहे. यामुळे तेथील सरकार सतत कठोर निर्णय घेत आहे. तेथील अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.