अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा -मार्तंड नेवासकर

Share This News

* शासकीय  तंत्रनिकेतनमध्ये रस्ता सुरक्षा अभियान

* अपघातमुक्त सेवा दिलेल्या वाहनचालकांचा गौरव

नागपूर, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकींच्या नियमांचे पालन करतानाच वाहनचालकांनी  हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणारी जीवितहानी टळू शकते. त्यामुळे जनतेने  वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड  नेवासकर यांनी केले.

 रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व घ्यावयाची काळजी यासंदर्भात विशेष रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. नेवासकर बोलत होते.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी हीरो मोटरचे वितरक प्रकाश जैन, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे, श्री. सोलंकी, श्रीमती राधा, कार्यक्रमाच्या संयोजक श्रीमती राजश्री वानखेडे तसेच मान्यवर उपस्थित होते.

 रस्त्यावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून वाहनचालकांकडून वाहतूक नियमासंदर्भात आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे रस्त्यावरील अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे सांगताना श्री. नेवासकर म्हणाले की, दुचाकी वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत असून अपघात टाळण्यासाठी  हेल्मेट घालणे आवश्यक आहे. शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांची माहिती सुलभपणे जनतेपर्यंत पोहचत आहे.या अभियानात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.  सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचाऱ्यांची जनआक्रोश ही संस्था नागपूरमध्ये कार्यरत आहे. नागपूरातील 70 टक्के ब्लॉक स्पॉट कमी केले आहे. गाडी ही आपली सोबती आहे अशी भावना नागरिकांनी ठेवून तिची काळजी घेणे आवश्यक आहे तरच अपघात कमी करण्यास मदत होईल, असे श्री. नेवासकर यांनी सांगितले.

 जागातील एक मोठी वाहन निर्मिती कंपनी म्हणून हिरो कपंनीकडे पाहिले जाते, या कंपनीचे 10 कोटी  टू-व्हिलर्स उत्पादित केली आहेत. शासकीय यंत्रणेसोबत खाजगी संस्थांचा सहभाग घेऊन रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम राबविल्यास या अभियानास गती येऊन अपघात कमी करण्यास मदत होईल, असे प्रकाश जैन यांनी सांगितले.  युनोने शून्य अपघाताचे प्रमाण करण्याचे ठरविले असून यामुळे त्यांच्या अभियानास मदत होईल. रस्त्यावर पार्किंगमुळे रस्ते लहान झालेले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताचे प्रमाण वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. जनतेमध्ये अपघाताविषयक विस्तृत जनजागृती करण्याची आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एका लहान चुकीमुळे जीवन गमवू नका. विद्यार्थी व तरुणांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.