पॉप स्टार रिहाना पाठेपाठ ग्रेटा थनबर्गची शेतकरी आंदोलनात उडी

दिल्ली

कृषी कायद्यांवरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस हे प्रकरण वेगळं वळण घेत आहे. केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं असून, शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. अनेक जणांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातच इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे.

नवीन कृषी कायदे रद्द करा, असं म्हणत दोन महिन्यांपूर्वी पंजाब, हरयाणासह देशातील विविध ठिकाणाहून शेतकऱ्यांना दिल्लीला धडक दिली होती. मात्र, शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं. तेव्हापासून सिंधू, टिकरी आणि गाझीपूर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसाचाराच्या आरोपानंतर शेतकरी आंदोलन आणखी पेटलं असून, आता त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटू लागले आहेत.

इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानापाठोपाठ तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.