फ्लोरिडात हल्लेखोराच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर (हिं.स.) फ्लोरिडात एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्लेखोर नौदलाचा माजी कर्मचारी असून त्याचे मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रायन रिले असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा ३३ वर्षांचा असून त्याने यापूर्वी नाविक दलात नेमबाजीचे काम केले आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या तीन महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. त्याने पोलिसांवरही हल्ला केला. त्यावेळी त्याला जखमी अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी विचारताच हल्लेखोर म्हणाला की, या लोकांनी माझ्याकडे जीवनदान देण्याची विनंती केली होती. मात्र मी त्यांना ठार केले. यावरुन त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.