सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे चार पंप नादुरुस्त

सिहोरा : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर शेतकर्‍यांचे खरीप व उन्हाळी धानाचे पीक आहे. परंतु कधी पंप दुरुस्त करण्यात येत नाही. शासन अनुदान रासी कंत्राटदाराला देत असताना घशात घालण्यात येत आहे. तीन वषार्पासून पंप दुरुस्त होत नाही बेजबाबदार कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येत नसल्याने प्रकल्प स्थळात सोंड्याटोला बचाव करिता आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघटाकीत गाळ व पंपात लाकडी ओंडके
पंपगृहाला नदीपात्रातून पाणी पुरवठा करणार्‍या टाकीत गाळ जमा झाली आहे. पाणी उपसा करणार्‍या पंपात लाकडी ओंडके शिरले आहेत. देखभाल व दुरुस्तीच्या नावावर कंत्राटदार प्रकाश मेर्शाम शासकीय अनुदानाची लूट करीत आहेत. त्यांनी कधी पंपाची आईलिंग व ग्रीसिंग केली नाही. त्यामुळे वारंवार पंपगृहात बिघाड होत आहे. शासनाची दिशाभूल कंत्राटदार करीत असल्याने जलद गतीने पाण्याचा उपसा होत नाही. यंत्रणाने प्रकल्पाचे लचके तोडले असल्याचे आरोप होत असून भाजपच्या रास्ता रोको आंदोलनाने प्रकल्पाला न्याय मिळाले नाही. चार नादुरुस्त पंपाची स्थिती जैसे थे आहे.
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात गेल्या तीन वर्षापासून चार पंप नादुरुस्त असतानाही यंत्रणेची कृपादृष्टी निविदा कंत्राटदार प्रकाश मेर्शाम यांचेवर आहे. वारंवार एकाच कंत्राटदाराला पंपगृहाचे कंत्राट देण्यात येत आहे. नादुरुस्त पंपगृहांची नासधूस करण्यात आली आहे. प्रकल्प स्थळात फक्त पाच पंपाने पाण्याचा उपसा सुरू असून जलाशयात पाण्याचा उपसा अडचणीत आलेला आहे. बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांशी सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्याचे चित्र ठिकठाक नसल्याची माहिती यंत्रणेला आहे. भाजपच्या रस्ता रोको आंदोलनात सध्या टोला सिंचन प्रकल्पातील पंपगृह याचा मुद्दा मोठ्याने गाजविण्यात आलेला आहे. यंत्रणेच्या अधिकार्‍यांना पंपगृह याची माहिती आंदोलनकर्त्यांनी विचारली असता भाषा बोभडी दिसून आली आहे. पंपगृह याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी निविदा कंत्राटदार प्रकाश मेर्शाम यांच्याकडे आहे. परंतु आंदोलनातून कंत्राटदार बेपत्ता होते.
प्रकल्प स्थळात ९ पंपांच्या साहाय्याने पाणी उपसा करण्यासाठी आहेत. परंतु कधी पूर्ण पंपाने पाण्याचा उपसा करण्यात आला नाही. गेल्या तीन वर्षापासून चार पंप व नादुरुस्त आहेत. अनेक पंपाचे साहित्य उपलब्ध नाहीत. बेजबाबदार कंत्राटदारणे पंपाची नासधूस केली आहे. यात यंत्रणेचे अधिनस्त अधिकारी जबाबदार आहेत. पंप दुरुस्त नसतानाही कंत्राटदाराला बिल अदा केले जात आहेत. लाखो चे बिल अदा करतांना साधी पंपाची चौकशी करण्यात येत नाही. पंप दुरुस्ती वरून मोठे आंदोलन झाले आहेत. आंदोलनकर्त्यांना आश्‍वासनाचे गाजर देऊन वेळ मारून नेली जात आहे. परंतु पंप कधी दुरुस्त होत नाहीत. बेजबाबदारपणे प्रकल्प हाताळणार्‍या एकाच कंत्राटदाराला वारंवार कंत्राट देण्यात येत आहेत.
दरम्यान प्रकल्प स्थळात फक्त ५ पंप सुरू आहेत. यामुळे नदीपात्रातून पाण्याचा उपसा करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा उपसा सुरू असताना चांदपूर जलाशयात पंचवीस फूट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. जलाशयाची क्षमता ३६ फूट पाणी साठवणूक करण्याची आहे. जलाशय रिकामे असताना उन्हाळी धानाची पिकांना पाणी वाटप अडचणीत येणार आहे. पावसाने दडी मारल्याने चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याची ओरड सुरू झाली आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण अधिकच कमी आहे.
खरीप हंगामातील धान पिकांना पाणी वाटप करताना जलाशयात पाणी शिल्लक राहणार नाही. यामुळे सन २0२२ च्या उन्हाळी धान पीक लागवडीसाठी पाणी वाटपाची आशा मावळणार आहे. कंत्राटदार प्रकाश मेर्शाम यांनी चार पंप दुरुस्त केले नसल्याचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. यामुळे गावातील शेतकरी संपूर्ण पंप दुरुस्त करण्यासाठी ओरड करीत आहेत. सोंडया टोला बचाव, प्रकाश मेर्शाम यांचे कंत्राट रद्द करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. मी जबाबदार कंत्राटदाराला अभय देणार्‍या अधिकार्‍यांचे मी तर आतून पंप दुरुस्ती करिता पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचे तयारीत शेतकरी आहेत. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्प बचावाचा नारा दिला आहे. आक्रोश मोर्चा करिता स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले आहे. गावात शेतकर्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.