तर ‘या’ बँकेचे ग्राहक 15 फेब्रुवारीपासून करू शकणार नाहीत पैशांचा व्यवहार

नवी दिल्लीः जर तुमचे बँक खाते (Bank Account) पूर्वीच्या अलाहाबाद बँकेत (Allahabad Bank) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलीनीकरण झाल्यानंतर अलाहाबाद बँकेच्या शाखांचे आयएफएएस कोड बदलणार आहेत. 15 फेब्रुवारी 2021 पासून आपल्या शाखेचे जुने  IFSC कार्य करणार नाहीत. जर कोणी जुना कोड वापरला, तर पैसे हस्तांतरित केले जाणार नाहीत. 1 एप्रिल 2020 पासून अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन झालीय.

Indian Bank म्हणते की, आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT), आईएमपीएस (IMPS) च्या व्यवहारासाठी लागणारा तुमचा नवीन आयएफएस कोड तुमच्या गृह शाखेशी संपर्क साधून मिळवावा लागणार आहे.

नवीन IFSC कोड कसा मिळवावा?

इंडियन बँकेने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडिओमध्ये बँकेने ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड मिळवण्याची प्रक्रिया सांगितलीय. बँकेच्या मते, आपण नवीन आयएफएससी कोड बँकेच्या वेबसाईटवर किंवा आपल्या जवळच्या भारतीय बँक शाखेतून मिळवू शकता. वेबसाईटवर दिलेल्या लिंकला भेट दिल्यानंतर तुम्ही शाखेचा जुना आयएफएससी कोड भरा. तो सबमिट केल्यानंतर आपल्याला एक नवीन IFSC आणि MICR कोड मिळेल. ग्राहक 15 फेब्रुवारी 2021 पासून नवीन IFSC कोड वापरण्यास सक्षम असतील.

नवीन IFSC कोड मिळाल्यानंतर काय करावे?

नवीन IFSC कोड प्राप्त झाल्यानंतर, आपण आपल्या खात्यात एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएसद्वारे निधी प्राप्त करण्यासाठी आपल्या रेमिटरला हा नवीन IFSC कोड देऊ शकता.

IFSC कोड म्हणजे काय?

ऑनलाईन व्यवहारासाठी बँकेचा IFSC अर्थात भारतीय वित्तीय प्रणाली कोड बँक खाते क्रमांकासह जोडावा लागतो. IFSC कोड 11 अंकांचा असतो. IFSC कोडमधील सुरुवातीच्या चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवितात. आयएफएससी कोड इलेक्ट्रॉनिक पेमेंटदरम्यान वापरला जातो. IFSC कोड नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) मध्ये वापरला जाऊ शकतो.

MICR कोड म्हणजे काय?

MICR कोड मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन आहे. जसे आपण त्याच्या नावाने समजू शकता. MICR कोड चेकवर मॅग्नेटिक शाईने छापलेला आहे. हे मुख्यतः सुरक्षितता बारकोड यांसारख्या व्यवहाराचे संरक्षण करण्यासाठी वापरले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.